Pune Koyta Gang

Pune Koyta Gang : “कोयता दाखवत फुकट चॉकलेट दे” म्हणणाऱ्या टोळीची पुणे पोलिसांनी काढली धिंड

773 0

पुणे : पुण्यात सध्या कोयता गॅंगचा (Pune Koyta Gang) सुळसुळाट सुरु आहे. विविध गुन्हेगारी कृत्ये करण्यासाठी हे कोयताधारी गुंड (Pune Koyta Gang) शहरात दहशत माजवताना दिसत आहे. नुकतीच पुण्यात एक घटना घडली आहे. यामध्ये एकाने चक्क फुकट चॉकलेट मिळवण्यासाठी दुकानदाराला कोयत्याचा धाक दाखवला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

Covid Scam Case : संजय राऊतांचे निकटवर्तीय सुजीत पाटकरांना अटक; EDची मोठी कारवाई

पुण्याच्या मुंढवा परिसरात 18 ते 20 वयोगटातील काही मुलांनी एका मेडीकलमध्ये घुसून कॅडबरी मागण्याच्या बहाण्याने कोयत्याने हल्ला केला. ही सर्व घटना मेडिकलमधील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली. यानंतर पोलिसांनी यावर तातडीने कारवाई करत या आरोपींची भररस्त्यातुन धिंड काढली आहे.

Nagpur Accident : CA परीक्षा उत्तीर्ण होऊन नव्या आयुष्याची सुरुवात करण्यापूर्वीच वैष्णवीचा दुर्दैवी अंत; Video आला समोर

पुण्यात मोठ्या प्रमाणात कोयता गँग दहशत (Pune Koyta Gang) माजवताना दिसत आहे. त्यामुळे पोलिसांनीदेखील आता त्यांच्याविरोधात अ‍ॅक्शन प्लॅन आखला आहे. हि गॅंग ज्या ठिकाणी दहशत माजवेल त्याच ठिकाणाहून नागरिकांसमोर त्यांची धिंड काढली जाते. सध्या पुणे पोलिसांनी शहरात कोंबिंग ऑपरेशन राबवायला सुरुवात केली आहे. त्यामार्फत अनेक गुन्हेगारांचा शोध घेतला जात आहे. सर्वात धक्कादायक म्हणजे या गॅंगमध्ये अल्पवयीन मुलांचादेखील मोठ्या प्रमाणात समावेश आहे.

Share This News
error: Content is protected !!
WhatsApp

WhatsApp

1
Join Us On WhatsApp 😊.
Hide