Pune PMC News | केंद्र शासनाशी संबधित मे.इंजिनिअर्स इंडिया लि. तर्फे महापालिकेच्या विकास कामांचे थर्ड पार्टी क्वालिटी ऑडीट होणार ; रस्ते व पायाभूत सुविधांच्या विकासकामांची गुणवत्ता सुधारण्यासाठी महापालिकेने उचलले महत्वाचे पाउल

पुणे – Pune PMC News | रस्त्यांवरील खड्डयांमुळे टीकेचे धनी बनलेल्या पुणे महापालिकेने Pune Municipal Corporation (PMC) कडक धोरणात्मक निर्णय घ्यायला सुरूवात केली आहे. महापालिकेची सर्व विभागांच्यावतीने होणार्‍या विकासकामांचे थर्ड पार्टी क्वालिटी ऍश्युरन्स हा केंद्र सरकारशी संबधित मे. इंजिनिअर्स इंडिया लि. तर्फे करून घेण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे महापालिकेच्या रस्ते, भवन, पाणी पुरवठा, ड्रेनेज, उद्यान अशा विविध विभागांच्यावतीने करण्यात येणार्‍या कामांचा दर्जा अधिक उंचावण्यास मदत होईल, असा विश्‍वास प्रशासनाच्यावतीने व्यक्त करण्यात येत आहे. (Pune PMC News)

महापालिका आयुक्त विक्रम कुमार (IAS Vikram Kumar) यांनी नुकतेच यासंदर्भातील आदेश सर्व विभागांना दिले आहेत. महापालिकेच्यवतीने करण्यात येणार्‍या विकास कामांचे थर्ड पार्टी ऑडीट मे. इंजिनिअर्स इंडिया लि. यांच्या मार्फत करण्याच्या प्रस्तावाला २२ जुलैला मान्यता देण्यात आली होती. या संस्थेमार्फत स्थापत्य विषयक विविध विकास कामांचा दर्जा, तांत्रिक परीक्षण व गुणवत्ता तपासणी करून घेण्यात येणार आहे. महाापलिका २००५ पासूनच विकास कामांचे थर्ड पार्टी क्वालिटी ऍश्युरन्स करत आली आहे. यामुळे मागील १७ वर्षांच्या कालावधीत सर्वच विभागाच्या कामांमध्ये बर्‍यापैकी सुधारणा झाली आहे. मात्र, नुकतेच रस्त्यांवर पडलेल्या खड्डयांमुळे थर्ड पार्टी ऍश्युरन्सबाबतही प्रश्‍न उपस्थित झाले आहेत. (Pune PMC News)

या पार्श्‍वभूमीवर महापालिकेने सर्व कामांसाठी केंद्र शासनाचा उपक्रम असलेल्या मे. इंजिनिअर्स इंडिया लि. या संस्थेची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. यासोेबतच थर्ड पार्टी ऍश्युरन्ससाठी विविध विभागाच्यावतीने वापरात असलेली संगणक प्रणाली आणि मोबाईल ऍप तसेच महापालिकेच्यावतीने विकसित करण्यात येत असलेली आयडब्ल्यूएमएस संगणक प्रणाली आणि मे. इंजिनिअर्स इंडिया लि. यांची थर्ड पार्टी क्वालिटी ऍश्युरन्स करिता वापरण्यात येत असलेल्या संगणक प्रणालीचे एकत्रिकरण करण्यात येणार आहे. यातून थर्ड पार्टी क्वालिटी ऍश्युरन्ससाठी लागणारा कालावधी कमी होउन अंमलबजावणी अधिक सुलभ होईल, असा विश्‍वास व्यक्त करण्यात येत आहे.

रेडिमिक्स काँक्रीट प्लांट (आरएमसी) साठी क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडियाचे प्रमाणीकरण आवश्यक

शहरामध्ये रस्ते व अन्य पायाभूत सुविधांच्या बांधकामांसाठी मोठ्याप्रमाणावर रेडिमिक्स काँक्रीटचा वापर
करण्यात येतो. रेडिमिक्स काँक्रीट गुणवत्तापूर्वक असावे यासाठी आरएमसी प्लांटचे क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडिया
(क्यूसीआय) यांच्याकडून प्रमाणीकरण करून घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. यामध्ये प्लांटमधील उपकरणे,
कर्मचारी, काँक्रीट मिक्स डिझाईन, उत्पादन चाचणी सुविधा, अंतिम उत्पादन वितरण,
उपकरणांचे नियंत्रण याचे प्रमाणीकरण क्यूसीआय मार्फत केले जाणार आहे.
त्यामुळे यापुढील काळामध्ये महापालिकेच्या विविध विभागांच्यावतीने काढण्यात येणार्‍या निविदांमध्ये
क्यूसीआय कडून प्रमाणीकरण करून घेतलेल्या आरएमसी प्लांटमधीलच रेडिमिक्स वापरण्याची अट नमूद
करण्याचे आदेशही महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिले आहेत.

Web Title :-Pune PMC News | M. Engineers India Ltd. related to Central Govt. A third party quality audit of the development works of the Municipal Corporation will be conducted by ;Important steps taken by the Municipal Corporation to improve the quality of road and infrastructure development works

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sanjay Raut | “प्रत्येकाने तुरुंगात जाण्याचे टाळले पाहिजे…” संजय राऊतांना आली प्रचिती

Maharashtra Politics | शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंना धक्का, 13 वा खासदार शिंदे गटात सामील