Pankaja Munde

Pankaja Munde : भाजप फुटेल असा दिवस येऊ नये : पंकजा मुंडे

612 0

मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून पंकजा मुंडे (Pankaja Munde) या भाजपवर नाराज असल्याचं बोललं जात आहे. पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी देखील अनेकदा आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवली आहे. त्यातच काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे आमदार आणि ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी पंकजा मुंडे यांची भेट घेतली होती. दोघा नेत्यांमध्ये जवळपास अर्धा तास बंददाराआड चर्चा झाली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चा निर्माण झाल्या होत्या.

Rahul Gandhi : राहुल गांधींना मोठा धक्का! गुजरात हायकोर्टाने ‘ती’ याचिका फेटाळली

यादरम्यान अजित पवार यांनी राष्ट्रवादीतून बंडखोरी करत आपल्या आठ नेत्यांसह मंत्रिपदाची शपथ घेतली. या मंत्र्यांमध्ये धनंजय मुंडे यांचा देखील समावेश आहे. धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानं पंकजा मुंडे नेमकी काय भूमिका घेणार याकडे राज्याचं लक्ष लागले होते. अखेर आज पंकजा मुंडे यांनी पत्रकार परिषद घेऊन या चर्चाना उत्तर दिले आहे.

Pankaja Munde : वेड्या बहिणीची वेडी ही माया ! भावाला मंत्रिपद मिळाल्याच्या आनंदात बहिणीने केले औक्षण

पंकजा मुंडेंच्या (Pankaja Munde) पत्रकार परिषदेतील काही महत्वाचे मुद्दे ?
सगळ्या राजकारणापासून लांब राहून 2 महिने सुट्टी घेणार
माझी राजकीय कारकीर्द संपवण्याचा अनेकांचा डाव आहे
लपून छापून काम करणाऱ्यांचा कंटाळा आला आहे
अंतर्मुख होणार आणि त्यानंतर पुढील निर्णय घेणार आहे
पक्षाने दिलेला आदेश मी नेहमी स्वीकारला आहे
भाजप फुटेल असा दिवस येऊ नये
मला पक्षाने अनेकदा डावलले तरी मी अनेकदा नाराजी व्यक्त केली नाही.
मला सध्या आरामाची गरज आहे
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री धनंजय मुंडेंचे केले अभिनंदन

Share This News
error: Content is protected !!
WhatsApp

WhatsApp

1
Join Us On WhatsApp 😊.
Hide