Pune Death

पुण्यात भरधाव दुचाकीने महिलेला उडवले; Video आला समोर

39678 0

पुणे : पुण्याच्या कर्वेनगर परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये भरधाव वेगात असलेल्या एका दुचाकीस्वाराने एका महिलेला उडवले. ही धडक एवढी भीषण होती कि यामध्ये या महिलेचा मृत्यू झाला. ही संपूर्ण अपघाताची घटना त्या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

काय घडले नेमके?
कर्वेनगर परिसर व उपनगरामध्ये अल्पवयीन मुलांकडून बेफामपणे गाड्या चालवल्या जातात. या घटनेत तरुणाचा हा बेफामपणा महिलेच्या जीवावर बेतला आहे. यामध्ये एका तरुणाने भरधाव गाडी चालवून एका महिलेला जोराची धडक दिली. या घटनेत ही महिला गंभीर जखमी झाली. तीला जखमी अवस्थेमध्ये रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि या तरुणावर कारवाई केली.

Share This News
error: Content is protected !!
WhatsApp

WhatsApp

1
Join Us On WhatsApp 😊.
Hide